Eknath Shinde saam tv
Video

Eknath Shinde: 'शिवनेरीवर काहीही कमी पडता कामा नये' शिंदेंचं मोठं आश्वासन

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावर कोणतीही कमी न होईल, असे आश्वासन दिले.

Dhanshri Shintre

आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५वी जयंती साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव उत्साहात पार पडला, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवनेरीवर काहीही कमी पडता कामा नये असे आश्वासन दिले.

शिवजयंती आपले लोक साजरे करत आहेत. काश्मीरमध्ये देखील भारत-पाक सीमेवर कुपवाडा या ठिकाणी आपल्या लष्कराने अश्वारुढ पुतळा उभा केला होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो आणि त्या पुतळ्याच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं.

पाकिस्तानने देखील हिंदूस्तानाकडे डोळे वटारुन पाहाण्याची हिम्मत करु नये, असा एक संकल्प आणि संकल्पना त्यामध्ये होती. मगाशी तुम्ही सगळ्यांनी निवेदनं दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आणि अजित दादांनी देखील सांगितले की सगळी कामे तुमची याठिकाणी होतील.

काही कमी पडणार नाही. कारण हे शिवनेरी आहे इथे कुठे कधी काही कमी पडता नये ही शासनाची जबाबदारी आहे. या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक सर्व सामान्यचे सरकार एक सुवर्णयुग आल्याशिवाय राहणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT