Pune Truck Accident saam tv
Video

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट दुकानाला धडकला | VIDEO

Pune Accident News : पुण्यात भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक थेट दुकानावर जाऊन धडकला. यामुळं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात किती जण जखमी झाले याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.

Nandkumar Joshi

Pune Truck Accident : पुण्यात सकाळी सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याच्या येरवडा भागात भरधाव ट्रक एका दुकानाला जाऊन धडकला. यानंतर मोठा आवाज झाला. दुकानाच्या वर एक घर आहे. या घरालाही ट्रकच्या धडकेनं मोठा हादरा बसला.

पुण्यातील येरवडा भागातील बाबासाहेब आंबेडकर चौकात हा अपघात झाला. भरधाव ट्रक एका दुकानाला जाऊन धडकला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक भरधाव वेगानं दुकानाच्या दिशेने आला आणि जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात लागली की ट्रकच्या काचाही फुटल्या आहेत. तर दुकानाचंही नुकसान झालं आहे. दुकानाच्या वर असलेल्या घरालाही या धडकेनं हादरे बसले. या अपघातानंतर जोराचा आवाज झाला. त्यामुळं काही वेळ घटनास्थळी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. घटना घडल्यानंतर तिथं मोठी गर्दी जमली होती. बाजूलाच वर्दळीचा रस्ता आहे. त्या ठिकाणी वाहतूक मंदगतीनं सुरू होती. काही वेळानं घटनास्थळी पोलीस देखील आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT