Helicopter Crash In Pune SaamTv
Video

Pune News : सुनील तटकरेंना घेण्यासाठी जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; तिघांचा दुर्दैवी अंत

Helicopter Crash : पुण्याच्या बावधन बुद्रुकमध्ये केके राव डोंगराळ भागामध्ये अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंना घेण्यासाठी जात असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंना घेण्यासाठी जाणारे हेलिकॉप्टर कोसळले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या बावधन बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले.

हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सजवळ असलेल्या हेलिपॅडपासून १.५ किमी अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं. बावधनच्या के. के कन्स्ट्रक्शन टेकडीवर ही घटना घडली. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ४ वाहनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होते. पुण्याहून मुंबईला हे हेलिकॉप्टर येत होते. उड्डाणानंतर अवघ्या ३ मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT