ब्राझीलमधील रिओ डी जनेरियोच्या पश्चिम भागात दोन हेलिकॉप्टर्सची एकमेकांशी धडक झाली. या अपघातात गायक ऑलिव्हर ट्रीसह त्यांतून प्रवास करणाऱ्या सहाही जणांचा मृत्यू झाला. रिओ डी जनेरियोच्या लष्करी अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर्सपैकी एक हेलिकॉप्टर एका कार शोरूमवर कोसळले. तेथे अनेक इलेक्ट्रिक वाहने उभी होती. यामुळे तिथे आग लागली, या धडकेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातग्रस्त झालेली हेलिकॉप्टर्स 'एअरबस H125' (Airbus H125) आणि 'बेल 206B जेटरेंजर' (Bell 206B JetRanger) कंपनीची होती. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात सकाळी साधारणपणे ८:५९ वाजता झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.