Kalyan station overcrowded as Central Railway locals delayed due to heavy rains in Mumbai. 
Video

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

Mumbai Rain News : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.कल्याण स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा आणि आसनगावकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.

Namdeo Kumbhar

मुंबई सह उपनगरात मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. कल्याणहून कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.

मुंबई आणि उपनगरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे, कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, इंडिकेटर व ट्रेनच्या सूचना न मिळाल्याने प्रवासी गोंधळून ब्रिजवरच थांबलेले दिसत आहेत, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून, कल्याणवरून कर्जत, कसारा, टिटवाळा, अंबरनाथ, आसनगाव, आणि बदलापूरकडे जाणाऱ्या लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत, कल्याण स्थानकावर इंडिकेटर व्यवस्थित सुरू नसल्याने प्रवाशांना वेळेवर सूचना मिळत नाही त्या मुळे ब्रिजवर उभे राहून प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे, अचानक ट्रेन आल्यास प्रवाशांची एकच धावपळ उडत असून अपघाताचा धोका वाढत आहे, नियोजित वेळेवर ट्रेनची माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT