Pune Rain Saam tv
Video

Pune Rain: पुण्यात पावसाचा हाहाकार! रस्ते पाण्याखाली, वाहनं बुडाली; नजर फिरवेल तिकडे पाणीच पाणी; पाहा VIDEO

Pune Rainfall Video: पुण्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. नजर फिरवेल तिकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

पुण्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पुण्यात कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पहिल्याच पावसामुळे पुणे जलमय झालं. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असणाऱ्या वाडकर मळ्यात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पुणेकरांना फटका बसल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केला आहे. मुळशी तालुक्यात आज दुपारी ३ वाजल्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. याठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला.

काही दिवसांपासून पुणे शहरात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याचे आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरातील उपनगर तसेच मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसू लागल्या. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २ दिवस पुणे शहरात पावसाची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे निश्चित काही पुणेकरांची तारांबळ उडाली असली तरी सुद्धा उकाडापासून पुणेकरांना नक्कीच या पावसाने दिलासा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay High Court: अविवाहित सज्ञान मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार - मुंबई उच्च न्यायालय

Ladki Bahin Yojana : पात्र असताना १५०० रुपये बंद, लाडक्या बहिणींचा वर्षावर आंदोलनाचा इशारा

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार मोदींना नक्की काय देतायत - दिपके

Skin Care: नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय; स्किन दिसेल क्लिन आणि ग्लोईंग

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वेचं तिकीट महागणार

SCROLL FOR NEXT