Nandurbar News Saam TV
Video

Nandurbar News : पावसाची तूफान बॅटिंग; नंदुरबार जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं | VIDEO

Heavy Rainfall In Nandurbar : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

नंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात तुफान पाऊस सुरू झाला आहे. गेल्या अर्धा तासापासून काकडदा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या यलो अलर्टनंतर जोरदार पाऊस बरसताना दिसून आला आहे.

वर्ष अखेरीस जोरदार पावसासह गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. राज्यातील काही तालुक्यात यलो अलर्ट देखील देण्यात आला होता. त्यानंतर आज नंदुरबार जिल्ह्यात आज काही भागात जोरदार पावसाने दुपारनंतर हजेरी लावली. नंदुरबारच्या काकडदा येथे तूफान पाऊस झाला असून यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. अर्धतास चाललेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडलेली बघायला मिळाली. तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांवरही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल असंही काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT