latur city saam tv
Video

Weather Alert: वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, लातूरकरांची तारांबळ|VIDEO

Latur News: लातूर जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे, यामुळे शहरातील अनेक लोकांच्या घरात पाणी गेल्याचे दिसत आहे.

Omkar Sonawane

यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काल देखील मुंबईसह पुणे, आणि राज्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. पुणे जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाने तूफान बॅटिंग केल्याने पुणे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिति निर्माण झाली होती. लातूर जिल्ह्यात देखील सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता.

मात्र दुपारनंतर लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात आणि शहरात मुसळधार तुफान पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट आणि वादळीवारा देखील सुरू झाली आहे. तर शहरातल्या अनेक भागात पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान पुढील तीन ते चार तास लातूर जिल्ह्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी देखील कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT