Flood-hit villages in Nanded district after heavy rainfall and overflowing Lendi river Saam Tv
Video

Nanded Flood: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Heavy Rain Flood Situation In Nanded: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने पुरस्थिती गंभीर झाली असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे.

Omkar Sonawane

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर आला

धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली

कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर व धर्माबाद भागात जनजीवन विस्कळीत

प्रशासनाने निचांकी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली

नांदेड: काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे. नांदेडसह लातूर आणि बिदर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला आहे. पुरामुळे लेंडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे लेंडी नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर आणि धर्माबाद या भागात पुरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून शेतजमिनी व घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. अचानक आलेल्या या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला असून निचांकी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT