Rain News Saam Tv
Video

Rain News : लातूर, वर्धा जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं, पाहा VIDEO

Heavy Rain In Latur And Wardha District : लातूर, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण झालीय.

Rohini Gudaghe

मुंबई : लातूर, वर्धा जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. लातूर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे, तर पावसामुळे औसा तालुक्यातील उजनी परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय.दरम्यान या पावसामुळे उजनी , एकंबी तांडा उजनी-मासुर्डी या गावांना जोडणारा रस्ता ओढ्याला पूर आल्याने काही काळ बंद झाला होता. वर्धा जिल्ह्यात सकाळपासून विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

वर्धा जिल्ह्यात रात्री पावसाची रिपरिप तर सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. हवामान विभागाने आजपासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होतोय, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होणार असल्याची माहिती मिळतेय. वायफड गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे नागरिकही भयभीत झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT