Commuters stranded amid heavy rush at Thane and Dadar railway stations during Mumbai rains. saam tv
Video

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Thane, Dadar Railway Station crowd : मुंबई आणि ठाण्यात सकाळपासूनच पावसानं धुमाकूळ घातला आहे. पुढील १२ तास धोक्याचे असल्याचा अलर्ट देण्यात आला असून, नोकरदार वर्ग घराची वाट धरू लागला आहे. लोकल ट्रेन उशिरानं धावत आहेत. त्यामुळं ठाणे आणि दादर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.

Nandkumar Joshi

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळला. पुढील १२ तास अत्यंत धोक्याचे असल्याचा अलर्टही देण्यात आला आहे. काही ठिकाणी आज दुपारनंतर शाळा सोडण्यात आल्या. तर उद्याही काही ठिकाणच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दुसरीकडे सकाळपासूनच रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत नोकरीसाठी सकाळीच घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

हवामान विभागाकडून पुढील काही तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग परतीच्या वाटेला लागला. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. त्यात लोकल सेवा अजूनही उशिराने आहे. फलाट क्रमांक दोन, तीन आणि पाचवर कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. तिकडे दादरमध्येही काही ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाची रिपरिपही सुरू होती. हिंदू कॉलनी, हिंदमाता, पारसी कॉलनी आदी परिसरात पाणी साचलं होतं. दादर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT