Akola Saam TV
Video

Akola : पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा, 5 जिल्ह्यात 4 दिवस पाऊस | VIDEO

Moderate to Heavy Rain Expected in West Vidarbha : पश्चिम विदर्भातल्या ५ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पश्चिम विदर्भातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. हवामान विभागाने पश्चिम विदर्भातील ५ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ५ दिवसांमध्ये म्हणजेच २९ जूनपर्यंत या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानातील अचानक बदल लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, या कालावधीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.त्यामुळे शेतीकामांमध्ये दक्षता घेणं गरजेचं आहे. प्रशासनाने जनतेला उघड्यावर वावरताना खबरदारी घेण्याचे, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे तसेच विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT