Mumbai Rain News Saam tv
Video

Mumbai Rain : छत्री घेऊनच बाहेर पडा! संध्याकाळानंतर मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain Forecast Latest News : मुंबईत संध्याकाळपासून मुसळधार पावसाचा इशारा; विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता. छत्री घेऊनच घराबाहेर पडण्याचा हवामान खात्याचा सल्ला.

Namdeo Kumbhar

Mumbai Orange Alert IMD : मागील दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने आज संध्याकाळनंतर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री घेऊनच बाहेर पडावे.

भारत हवामान खात्याने (IMD) मुंबईत शनिवारपर्यंत वादळी पाऊस आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाळा अद्याप शहरात दाखल न झाल्याने हा इशारा चिंता वाढवणारा आहे. हवामान खात्याच्या मते, येत्या काही दिवसांत शहरात वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पावसामुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने पूरपरिस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT