Harshawardhan Patil PakshPravesh SaamTv
Video

Indapur News : इंदापुरात दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील; पक्षप्रवेशानंतर उमेदवारी जाहीर होणार?

Harshwardhan Patil : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेला इंदापूरमधून त्यांना उमेदवारी मिळेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. इंदापूरमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर अजित पवार यांच्या पक्षाचा दावा आहे. विद्यमान आमदार अजित पवार यांचा असल्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. या कारणाने हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते तुतारी हाती घेणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा करत आज कार्यकर्त्यांसह त्यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्यामुळे आता दत्ता भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांचं आव्हान उभ ठाकण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या या सोहळ्यात शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर करतात का? हे पाहाणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT