VIDEO: पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून केली जाते हफ्ता वसुली Saam TV
Video

VIDEO: पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून केली जाते हफ्ता वसुली, Vijay Wadettiwar गंभीर आरोप

Vijay Wadettiwar News: पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलीसांवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली आहे. पुण्यात 450 ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात पाच लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जातो. पब नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत पब सुरु आहेत. 27 पबला कुठलाही परवाना नव्हता. विना परवाना 27 पब चालत असतील तर पोलीस आयुक्त झोपा काढत होते का ? असं म्हणत त्यांनी पुणे पोलीसांवर आरोप केले आहेत. यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT