Tukdebandi Kayda  
Video

Maharashtra Government : राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश

Maharashtra Government Legalizes Gunthewari Plots : महाराष्ट्रात गुंठेवारीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राज्यपालांनी अध्यादेश काढून १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या गुंठेवारीला विनामूल्य नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

राज्यात गुंठेवारीला अधिकृत परवानी देण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका हद्दीतील व शेतीच्या गुंठेवारीला परवानगी देणारा नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळातील गुंठेवारी फुकटात नियमित केली जाणार आहे. संबंधित काळातील निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र कोणतेही पैसे न आकारता नियमित केले जाईल. १ जानेवारी २०२६ पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने 'महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण' कायद्यात सुधारणा करणारा नवीन अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अध्यादेशानुसार, '१५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळात निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी हस्तांतरित झालेले जमिनीचे तुकडे कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमित केले जाणार आहेत'. यामुळे अनेक वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेले व्यवहार आता अधिकृत होणार असून, मालकी हक्काच्या नोंदी सुलभ होतील. हा निर्णय महानगरपालिका, नगरपरिषदा आणि विविध विकास प्राधिकरणांच्या हद्दीत लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Thombre : चाकणकरांसोबतचा वाद भोवला? रूपाली ठोंबरेंना राष्ट्रवादीचा धक्का, महत्त्वाचं पद घेतले काढून

Maharashtra Live News Update : पुणे पोलिसांचे निलेश घायवळ प्रकरणी ई डीला पत्र

Raj Thackeray’s Security Tightened: राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ; ‘शिवतीर्थ’बाहेर पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त, कारण काय? VIDEO

मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्यामुळे २ राष्ट्रवादी एकत्र, कोल्हापूरचं राजकारण फिरलं

तुमचा गेम करायचाय...; अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, VIDEO

SCROLL FOR NEXT