Marathi Gujarati clash Saam tv
Video

Marathi Gujarati clash : आपुल्याच घरात हाल सोसतो मराठी माणूस; घाटकोपरमध्ये गुजराती कुटुंबाकडून गायकवाड कुटुंबाला मारहाण, VIDEO आला समोर

Mumbai Ghatkopar News : घाटकोपरमध्ये गुजराती कुटुंबाकडून गायकवाड कुटुंबाला मारहाण झाल्याची घटन घडली आहे. कुत्रा पाळल्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये मारहाण झाली.

Vishal Gangurde

मुंबईच्या घाटकोपर पूर्व येथील रायगड चौक परिसरात असलेल्या साई जेठा इमारतीमध्ये मराठी-गुजराती वाद झाल्याची चर्चा होती. मात्र हे प्रकरण घरातील कुत्र्यामुळे झाल्याचे या दोन्ही बाजूच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गायकवाड आणि माखवाना आणि इतर मराठी, गुजराती कुटुंब रहातात. गायकवाड कुटुंबाकडे एक कुत्रा आहे. जो त्यांच्या घराच्या बाहेर कॉमन पॅसेजमध्ये असतो. हा कुत्रा इथल्या इतर कुटुंबावर धावून जातो. या कुत्र्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. यावरून गायकवाड कुटुंब आणि इतर कुटुंबामध्ये वाद होत असतात. याच प्रकारे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. त्याठिकाणी इतर मराठी कुटुंबही होती. मात्र याला गुजराती विरुद्ध मराठी असा रंग देण्यात आल्याचे स्थानिकांची म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT