Govinda  Saam TV News
Video

Lok Sabha Election 2024: मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार का? अभिनेते Govinda यांचं उत्तर समोर!

Bollywood Actor and Former MP Govinda in Nagpur: नागपूर विमानतळावर दाखल होताच अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. यश हे कर्तृत्वावरच मिळतं, असं गोविंदा यांनी यावेळी म्हटलं.

Saam TV News

नागपूर : मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न गोविंदा यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते मुंबईतून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र उमेदवारीच्या अनुशंगाने आपली कोणतीही चर्चा न झाल्याची माहिती अभिनेते गोविंदा यांनी यावेळी दिली. रामटेकमध्ये राजू पारवे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांची प्रचार सभा होणार होती. त्यासाठी गोविंदा नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. नागपूर विमानतळावर दाखल होताच अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. यश हे कर्तृत्वावरच मिळतं, असं गोविंदा यांनी यावेळी म्हटलं. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील महत्त्वाचे मतदार संघातही निवडणूक होणार आहे. गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत शिवसेनेत नुकताच प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची ही पहिलीच प्रचार सभा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT