Mumbai Local Train Latest Updates  Saam TV
Video

Mumbai Local Train : मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा, लोकल ट्रेनची संख्या दुपट्टीने वाढणार; रेल्वेचा नवा प्लॅन समोर

Mumbai Local Train Latest Updates : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत आता दर अडीज मिनिटांनी लोकल धावणार आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

Satish Daud

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत आता दर अडीज मिनिटांनी लोकल धावणार आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. सध्या मुंबईतील दोन लोकल ट्रेनमधील अंतर हे तीन मिनिटाचं आहे. मात्र, अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो.

यातील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेनला CBTC यंत्रणा जोडली जाणार आहे. या यंत्रणेमुळे तिन्ही मार्गावर लोकल दर अडीज मिनिटाला येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून ट्रेनमधील गर्दी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

अशा प्रकारची प्रणाली लावणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. या प्रणालीने येत्या ३ वर्षात लोकल ट्रेनची संख्या अगदी दुप्पटीने वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. येत्या काही महिन्यातच ही प्रणाली राबण्यात येणार असल्याची माहिती आश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT