Mumbai CM oath taking ceremony saam tv
Video

Oath taking ceremony : सोनं, मोबाइल, कॅश...मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा डल्ला, VIDEO

CM Oath taking ceremony : मुंबईतील आझाद मैदानातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांनी डाव साधला. उपस्थित कार्यकर्त्यांकडील मोबाइल, सोन्याचे दागिने आणि कॅश लांबवली.

Nandkumar Joshi

एरवी वेगवेगळे मुद्दे, प्रश्नांवरून आंदोलन आणि घोषणांनी दणाणून जाणाऱ्या मुंबईतील आझाद मैदानात ५ डिसेंबरला आनंदाची लाट आली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होता. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समर्थकांच्या घोषणांनी या आनंदाला पारावार उरला नव्हता. समर्थक, कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी आनंद साजरा करत असतानाच, चोरटे मात्र सावज शोधत होते. या चोरट्यांनी संधी साधून ४ महिलांसह ११ जणांकडील कॅश, दागिने आणि मोबाइलवर डल्ला मारला.

त्यांच्याकडील सोन्याच्या चेन लांबवल्या. तर कार्यकर्त्यांकडील हजारोंची रोकड लंपास केली. चोरट्यांनी या सोहळ्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडील तब्बल १२ लाखांचा ऐवज लांबवला. या शपथविधी सोहळ्यात कडेकोट बंदोबस्त होता. आझाद मैदानाच्या चहूबाजूला पोलिसांचा कडा पहारा होता. पण पोलिसांची नजर चुकवून या चोरट्यांनी सावज हेरून हात साफ केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT