Gold and silver prices witnessed a sharp rise in the Indian bullion market amid strong global cues. Saam Tv
Video

सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ; चांदी अडीच लाखांवर, सोन्याचा भाव कितीवर पोहोचला? VIDEO

Gold Price Today In India Per Tola: सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. चांदीचा दर प्रति किलो अडीच लाखांच्या पुढे गेला असून, सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख ४३ हजारांवर पोहोचला आहे.

Omkar Sonawane

सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. बाजारात चांदीच्या दरात तब्बल २३ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाल्याचा दावा करण्यात येत असून, चांदीचा दर प्रति किलो अडीच लाखांच्या पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. ही वाढ गुंतवणूकदारांसह ग्राहकांसाठीही महत्त्वाची ठरत आहे.त्याचबरोबर सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीत १,९०० रुपयांची वाढ होऊन दर प्रति तोळा १ लाख ४३ हजार रुपयांवर पोहोचल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, आगामी काळात लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी नवीन दरांची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahar Shaikh : मुंब्रा हिरवं करू म्हणणाऱ्या सहर शेखला पोलिसांची नोटीस

Akola Mayor: अकोल्याचा महापौर कोण होणार? भाजप की ठाकरेसेना? कोण बसणार खुर्चीवर?

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Kokan Tourism: शुभ्र वाळू, सोनेरी खडक आणि...! कोकणात इतका सुंदर बीच तुम्ही पाहिलाच नसेल

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT