Gokul Milk Price Hike: Saam Tv
Video

Gokul Milk Price Hike: मोठी बातमी! गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ, म्हशीचे ६ तर गाईच्या दुधात २ रुपयांची वाढ

Gokul Milk: गोकुळच्या ग्राहकांना मोठा झटका बसला. गोकुळ दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. म्हशीचे ६ तर गाईच्या दुधात २ रुपयांची वाढ झाली.

Priya More

गोकुळच्या दूध उत्पादक आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोकुळच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात तब्बल ६ रुपयांची तर खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

संस्थेला असलेली सुमारे ७० कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी दूध विक्री दरात ही मोठी वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. येत्या शनिवारपासून नवे दर लागू होणार असून जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता आणि परिस्थिती पाहून पुन्हा एकदा दरवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayushman Card : आयुष्मान कार्ड असूनही 'या' उपचारांचा खर्च मिळणार नाही, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त घोषित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूरात धावपळ |VIDEO

विरोधी पक्षाच्या महिला खासदाराच्या ताफ्याला घेरलं, कारवर अंडी फेकली; भाजपवर आरोप VIDEO व्हायरल

Political News: जागा वाटपावरून आघाडीत तिढा; अखिलेश यादवांनी काँग्रेसला फॉर्म्युला सांगितला, 'इतक्याच' जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT