संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठी उलथापालथ झाली असून राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी एकाहाती सत्ता स्थापन करण्याकडे कूच करत आहे. मतमोजणीमध्ये सतेज पाटील यांच्या समविचार आघाडीचे तब्बल 14 उमेदवार आघाडीवर आहेत. 25 पैकी 14 चा आकडा हा बहुमताचा आकडा आहे, सतेज पाटील यांनी हा आकडा पार करत जोरदार मुसंडी मारली आहे. तर महायुतीचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीला दणका बसण्याची शक्यता आहे. जर हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राहिल्यास सतेज पाटील हे एकहाती सत्ता स्थापन करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.