रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
गोकुळ दूध संघातील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात आता दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ कसबा बावडा येथील भगवा चौकात शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शासनाचा हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक नागरिक, आजी-माजी नगरसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, या आंदोलनाची धग आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातून हजारो नागरिक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आंदोलकांनी केली आहे. या मोर्चातून शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत सरकारला जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयावरून सुरू झालेला संघर्ष आता रस्त्यावर उतरला असून, सोमवारी निघणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.