Nashik Saam TV
Video

Nashik : नाशिकमध्ये गोदावरीला पूर! सलग ५ व्या दिवशी गंभीर स्थिती |VIDEO

Godavari River Flood : गोदावरी नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धरणांतून जोरदार विसर्ग सुरू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शहरात सलग पाचव्या दिवशी गोदावरी नदीची पूरस्थिती कायम असून पावसाची संततधार सुरूच आहे. गोदावरी नदी ही दुथडि भरुन वाहताना बघायला मिळत आहे. त्यामुळे रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर सलग पाचव्या दिवशी पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेले आहे. या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी याच कालावधीत हा साठा केवळ ५ ते ६ टक्क्यांदरम्यान होता.गेल्या काही दिवसांपासून गंगापूर, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर या प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून तब्बल ४ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी नदीच्या काठावर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: काँग्रेसचा बडा नेता भाजपवासी; पक्षप्रवेशावेळी मंत्रोच्चार, स्टेज दुमदुमला, पाहा VIDEO व्हायरल

राज ठाकरेंच्या भाषणानंतर अमराठींची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले? पाहा,VIDEO

Horrific Accident : थरारक! भरधाव कारने २० हून अधिक जणांना चिरडलं, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update: मालेगाव जन्म दाखला घोटाळा प्रकरण,नायब तहसीलदार व त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ

Panic Attack: पॅनिक अटॅक का येतो? महत्त्वाची कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT