Nanded police diving into the Godavari River during a high-risk operation to stop illegal sand mining. Rafts were destroyed and material worth ₹21.75 lakh was seized. Saam Tv
Video

Nanded News: गोदावरीत काहीतरी चाललं होतं… पोलिसांनी थेट नदीमध्ये उड्या मारल्या आणि मग काय घडलं? VIDEO

Nanded Police Action: नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रात पोलिसांची धडक कारवाई, अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी थेट नदीमध्ये उड्या मारत कारवाई केली.

Omkar Sonawane

नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे ही कारवाई करताना पोलिसांनी थेट गोदावरी नदीच्या पाण्यात उड्या मारत अवैध वाळू उपसावर आळा घातला. यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले मजूर अवैध वाळू उपसासाठी काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसामुळे पर्यावरणासह जलसंपत्तीवरही धोका निर्माण झाला असून, पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई कौतुकास पात्र ठरते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT