छत्रपती संभाजीनगर  Saam Tv
Video

Crime News: महाराष्ट्रातील गुंडगिरीचा हा घ्या पुरावा, संतापजनक VIDEO बघा

Shocking Incident in Gangapur: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.यातच एक व्हिव्डिओ समोर आला आहे जो बघून तळपायाची आग मस्तकात जाईल.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे भरदिवसा टवाळखोरांनी एका मुलीची छेडछाड केली. हा प्रकार वारंवार घडत असल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता गावगुंडांनी त्यांना, मुलीला आणि तिच्या आईलाही बेदम मारहाण केली. मध्यस्थी करण्यास आलेल्या काही लोकांनाही मारहाण करण्यात आली.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्याने महाराष्ट्र सुन्न झाला होता, आणि आता गंगापूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेली ही मुलगी शाळेत जाताना व परत येताना काही टवाळखोर वारंवार छेडछाड करत होते. याचा जाब विचारण्यासाठी तिचे वडील गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गावगुंडांनी मुलगी आणि तिच्या आईलाही बेदम मारले. मारहाण करताना समोर महिला आहे की मुलगी, याचा विचारही केला गेला नाही.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: पुरावं मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

SCROLL FOR NEXT