Gangapur Dam Water Storage Saam Tv
Video

Nashik Gangapur Dam : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, गंगापूर धरण 44 टक्के भरलं | VIDEO

Gangapur Dam Water storage : नाशिकसाठी गुड न्यूज आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळं गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशासह महाराष्ट्रात मान्सूनचं यंदा लवकर आगमन झालं आहे. याशिवाय मे महिन्यातच महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतली असली तरी, अधेमधे पावसाची बॅटिंग सुरूच आहे. मुंबईसह ठाणे आणि कोकणातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पुण्यात तर सखल भागांत पाणी साचलं होतं. नाशिकमध्येही दमदार पाऊस झाला. त्यामुळं नाशिककरांसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यातच चांगली वार्ता आली आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात नव्याने पाण्याची आवक वाढलीय, धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झालीय. धरणात २५०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्के अधिक पाणीसाठा झालाय. जूनच्या सुरुवातीलाच गंगापूर धरण 44 टक्के भरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Rahul Gandhi: अमित शाह यांना गृहमंत्रीपदावरून हटवा; राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांवरील मारहाणीला अमित शहा जबाबदार - राहुल गांधी

Nalasopara firing : मध्यरात्रीची वेळ, अचानक रिसॉर्टमध्ये गोळीबाराचा आवाज झाला; परिसर हादरला

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

SCROLL FOR NEXT