भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री गणेश नाईक यांनी राजकारणाबाबत एक मोठे आणि सूचक विधान केले आहे. मनोज जरांगेंनी दाखवलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. येत्या 2 ते 3 महिन्यांत राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असा दावाही त्यांनी केला आहे. "काल-परवा जे काही घडले, त्याच्याशी माझा थेट संबंध नाही. पण येत्या ५ ते ६ महिन्यांत किंवा अवघ्या २ ते ३ महिन्यांत राजकारणात बऱ्याच मोठ्या गोष्टी घडतील, हे मी आज तुम्हाला सांगतो., असे नाईक म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ९० च्या दशकापासून त्यांनी वर्तवलेल्या अनेक गोष्टी उशिरा का होईना पण खऱ्या ठरल्या आहेत आणि आगामी काळातही राजकीय पटलावर अशाच घडामोडी पाहायला मिळतील. अलीकडेच घडलेल्या काही प्रकरणांशी (व्हायरल ऑडिओ क्लिप) माझा थेट संबंध नाही, असे सांगत त्यांनी हे भाकीत वर्तवले आहे. त्यांच्या या गूढ इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.