Devendra Fadnavis SaamTv
Video

CM Devendra Fadnavis : शेवटचा जिल्हा नाही, तर...; देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोलीबद्दल मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Fadanvis Statement On Gadchiroli : गडचिरोलीती गट्टा - गर्देवाडा - वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी - गर्देवाडा - गट्टा - अहेरी बससेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं.

Saam Tv

गडचिरोलीच्या या भागात माओवाद्यांचे पूर्ण वर्चस्व होते. आज तेच वर्चस्व आम्ही संपवत आहोत. याठिकाणी एक रस्ताही नव्हता, मात्र आज इथे आम्ही छत्तीसगडला थेट जोडणारा रस्ता आणि पूल बांधला आहे. इतकंच नाही तर इथल्या नागरिकांना 75 वर्षानंतर राज्य परिवहन महामंडळाची बस बघायला मिळणार आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गट्टा - गर्देवाडा - वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी - गर्देवाडा - गट्टा - अहेरी बससेवेचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राहणार नाही, तो महाराष्ट्रातील पहिला जिल्हा असेल, असंही त्यांनी बोलताना म्हटलं.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आता इथे माओवाद्यांना नवीन लोक भेटत नाहीत. माओवाद्याची भरती बंद असून मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत. स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर पहिल्यांदाच या भागामध्ये बस सेवा सुरू झाली आहे. या भागात चांगले रस्ते आणि पुल विकसित केले गेले, असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका, अचानक व्हिसा अपॉइंटमेंट बुकिंग थांबवली; कारण आलं समोर

Warm milk before bed: रात्री फक्त दुधात मिसळून प्या हे 3 पदार्थ, शांत झोप लागण्यास मिळेल मदत

मध्य रेल्वेवर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल अन् एक्सप्रेसच्या वेळेत बदल, पाहा A टू Z माहिती

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बेत बिघडली, खासदार संजय राऊतांचा दावा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT