Roha NCP BJP Clash during Voting saam tv
Video

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

NCP- BJP Clash Video : महाडमध्ये मतदानाच्या दिवशी वाद पेटल्यानंतर आता रोह्यात देखील मारहाणीची घटना घडली. भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पण रायगडमधील महाड आणि रोह्यात मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. रोह्यात नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पेटली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली. यावरून मोठा वाद पेटला. रोह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, राज्यातल्या इतर ठिकाणीही निवडणूक मतदानावेळी वाद झाले. मनमाडमध्ये प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळं मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांची भीतीनं पळापळ झाली. मुक्ताईनगरातील मतदान केंद्रामध्येही कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला होता. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील केंद्रावरही राडा झाला. बोगस मतदान करताना चार जणांना पकडून दिल्यानं वाद झाला. या बोगस मतदारांना चोप देण्यात आला. यामुळं काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election : झेडपीसाठी या जिल्ह्यात युतीची घोषणा, भाजप अन् शिंदेसेना किती जागा लढणार?

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Mumbai Ahmedabad Expressway: गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा कारण

Glowing skin tips: व्हाईटहेड्स परत कधीच येणार नाहीत; या ६ सिक्रेट स्किन केअरचा करा वापर

Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

SCROLL FOR NEXT