Ajit Pawar plane crash investigation updates Saam
Video

अजित पवार यांच्या अपघातवर नवे पुरावे समोर? Rohit Pawar यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

Ajit Pawar plane crash investigation updates : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवे दावे समोर आले असून रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत तपासाच्या गतीवर प्रश्न उपस्थित केले. DGCA अधिकारी बारामतीत पोहोचल्याने चौकशीला वेग मिळाल्याचे संकेत आहेत.

Namdeo Kumbhar

Rohit Pawar statement on crash probe : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळताना दिसत आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून काही महत्त्वाचे दावे केले आहेत. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, तपास यंत्रणांच्या कामावर त्यांचा आक्षेप नाही, मात्र ज्या गतीने हा तपास सुरू आहे त्या 'स्पीड'वर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. पत्रकार परिषदांमुळे या प्रकरणाच्या तपासाला जोर आला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, दिल्लीत पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे (DGCA) अधिकारी खाजगी विमानाने बारामतीला पोहोचले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Agreement ते घर खाली करेपर्यंत; भाडेकरूंसाठी ६ नवे नियम, आताच घ्या जाणून

Maharashtra News Live Update: अमरावतीत सर्वोच्च तापमानाची नोंद, ३७ वर्षानंतर ३९.६ अंश तापमान

Street Style PaniPuri: घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल चटपटीत मसालेदार पाणीपुरीचं पाणी!

Best Drinks for Liver Health : लिव्हरच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ 5 बेस्ट ड्रिंक्स; यकृतावरची हट्टी चरबी झटक्यात होईल कमी

Election Result : बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, त्यातही काँग्रेसचा दारूण पराभव, फक्त २ जागा जिंकल्या

SCROLL FOR NEXT