Mumbai News  Saam tv
Video

Mumbai : मुंबईजवळील समुद्रात पुन्हा बोटीचा अपघात; जहाजाच्या धडकेत बोट बुडाली, थरारक व्हिडिओ आला समोर

Mumbai boad accident : मुंबईजवळ पुन्हा बोटीचा अपघात झाला आहे. जहाजाच्या धडकेत मासेमारी करणाऱ्यांची बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईजवळील समुद्रात नीलकमल बोटीचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना मढजवळ पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या मढजवळ समुद्रात दोन मासेमारी करणाऱ्या बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मालवाहू जहाजाने दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या मढ समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजाचा शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे मासेमारी करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटीतील सहा खलाशांनी संपूर्ण रात्रभर जागून बोट समुद्रात बुडण्यापासून वाचवल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर कोस्ट गार्डने तिसाई या मासेमारी करणाऱ्या बोटीला मढ बंदरावर आणलं. मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे चालक हे नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मासेमारी करणाऱ्या बोटीच्या मालकाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT