Gandhi Family News SaamTv
Video

Gandhi Family News: गांधी घराण्यातील तिघे इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी संसदेत!

Gandhi's In Sansad Bhavan : गांधी घराण्यातील तिघे जण प्रथमच एकाचवेळी कॉंग्रेसचं नेतृत्व करणार असून इतिहासात पहिल्यांदाच असं होणार आहे.

Saam Tv

गांधी घराण्यातील तिघे जण प्रथमच एकाचवेळी कॉंग्रेसचं नेतृत्व करताना दिसणार आहेत. संसदेत आई सोनिया, मुलगी प्रियंका आणि मुलगा राहुल हे एकाच वेळी कॉंग्रेसकडून प्रतिनिधित्व करणार आहे. सोनिया गांधी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहतील. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता. तर वायनाडची पोटनिवडणूक लढवून विजयी झालेल्या प्रियंका गांधी या लोकसभेत बघायला मिळतील.

आज प्रियंका गांधी यांनी पोट निवडणूक जिंकल्यानंतर संसदेत प्रवेश करत शपथ घेतली. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघे एकत्र दिसून आले. यावेळी भाऊ राहुल गांधी यांनी बहिण प्रियंका गांधी यांचे संसद भवनाच्या परिसरात फोटो देखील काढल्याचं बघायला मिळालं आहे. तसंच या तिघांनी एकत्र फोटो काढून आपल्या सोशल मिडियावर देखील शेअर केला आहे. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे तिघं कॉंग्रेसचं अशाप्रकारे एकत्र नेतृत्व करणार आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT