Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगेंनी मुस्लीम, मराठा, दलित अशी मोट बांधत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय.. मात्र जरांगेंची नवी रणनीती काय आहे? जरांगेंच्या रणनीतीचा फटका कुणाला? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मनोज जरांगेंनी एका जातीवर निवडणूक जिंकता येणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता विधानसभेसाठी नवा फुलप्रुफ प्लॅन तयार केलाय.. तर मराठा, मुस्लीम, दलित समाजाला एकत्र करत भाजपचा सुफडा साफ करण्याचा निर्धारच जरांगेंनी केलाय.

मनोज जरांगेंनी 3 नोव्हेंबरला उमेदवारांची नावं जाहीर करण्याचं स्पष्ट केलंय.. मात्र मनोज जरांगेंनी मराठा- मुस्लीम आणि दलित समीकरण एकत्र केल्याने त्याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या एमएमडी फॅक्टरचा प्रभाव किती मतदारसंघात आहे, जाणून घेऊ...

एमएमडी फॅक्टरचा मविआला फटका?

दलित समाजाचा प्रभाव असलेल्या 88 पैकी 51 मतदारसंघात मविआला आघाडी

मुस्लीम बहुल 15 मतदारसंघात मविआला फायदा

जरांगे फॅक्टरचा 48 मतदारसंघात थेट प्रभाव

मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाच्या धर्मगुरुंना एकत्र करत जरांगेंनी नवी मोट बांधलीय.. मात्र लोकसभेला महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या मराठा, मुस्लीम आणि दलित मतं जरांगेंकडे वळल्यास त्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगेंचं नवं समीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार की भाजपचाच सुफडा साफ करणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Maharashtra News Live Update: नाशिक विधानपरिषदेसाठी गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT