PM Modi Praises FlyDubai Captain Smit Machhar’s Courage Saam tv
Video

PM Narendra Modi : "हनुमान चालीसा म्हटली अन्.." फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार पीएम मोदींशी संवाद साधताना झाले भावुक; पाहा Video

PM Narendra Modi On Smit Machchhar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. गंभीर जखमी असतानाही प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याबद्दल मोदींनी त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं.

Alisha Khedekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. गंभीर जखमी झाल्यानंतरही प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. “भारतीय प्राण घेणारे नाही, तर प्राण वाचवणारे आहेत,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. या संवादादरम्यान स्मित मच्छार भावुक झाले होते. हल्ल्याच्या वेळी नेमकी परिस्थिती कशी होती, याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. त्या कठीण प्रसंगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू असतानाच विमानातील प्रवाशांना कोणतीही इजा होऊ नये, याची जाणीव सतत मनात होती, असं त्यांनी सांगितलं. कठीण प्रसंगात मी हनुमान चालीसा म्हणत होतो, अशी माहितीही कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधानांना दिली. त्यांच्या या अनुभवाचं मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतलं आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. सध्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Rajgira Laddu Recipe : नवरात्रीत उपवासाला खा टेस्टी राजगिरा लाडू; प्रोटीनसह मिळेल दिवसभराची एनर्जी, रेसिपी १० मिनिटांत तयार

Maharashtra News Live Update: मंगळवेढ्यात दुष्काळाची दाहकता; आमदार समाधान आवताडेंकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी

Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

Bollywood Actor Arrested: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT