Parents in shock as five Nanded students were among 17 children rescued from Powai’s RA Studio horror film incident. Saam Tv
Video

पवईतील भयावह घटनेत नांदेडच्या पाच विद्यार्थ्यांचा समावेश|VIDEO

Rohit Arya Encounter And Rescue Operation In Powai: मुंबईच्या पवई येथील आरए स्टुडिओमध्ये हॉरर फिल्मसाठी बोलावलेल्या १७ मुलांपैकी नांदेडमधील पाच मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

Omkar Sonawane

मुंबईच्या पवई येथे घडलेल्या घटनेनंतर अख्खा महाराष्ट्र हादरला. एका हॉरर फिल्मसाठी राज्यभरातून 800 जणांना कास्टिंग डायरेक्टरच्या माध्यमातून मुंबई येथे बोलावण्यात आलं होतं. 800 पैकी 17 मुलांची निवड या फिल्मसाठी करण्यात आली. या 17 मुलांमध्ये नांदेडच्या पाच मुलांचा समावेश होता. नांदेड शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या मुलांसाठी चार दिवसाचे प्रशिक्षण मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. रोहित आर्या याने सिस्टीमच्या विरोधात एक हॉरर फिल्म बनवण्याचं ठरवलं होतं. रोहित आर्याने RA स्टुडिओच्या वर 17 मुलांना डांबून ठेवण्यात आलं. हा सर्व प्रकार घडत असताना याची सूत मात्र कल्पना देखील इथे असलेल्या पालकांना येऊ दिली नाही. स्टुडिओच्या खाली पालकांचे देखील चित्रीकरण करण्यात आलं. खाली चित्रीकरण संपल्यानंतर रोहित आर्यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

रोहित आर्याने मुलांना पोलीस ठेवल्याचा प्रकार समोर आला.आणि तिथेच सर्व पालकांची धावपळ उडाली. रोहित आर्याचा एन्काऊंटर झाला. या 17 मुलांमध्ये नांदेडचे पाच मुलं होती. यापैकी काही मुलं आपल्या पालकांसोबत नांदेडला परतली आहेत. काही मुलं अजून देखील मुंबई येथे आपल्या पालकांसोबत आहेत. सर्व पालक आणि मुलं आता सध्या भीतीच्या सावठाखाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या मुलांचे पालक माध्यमांसमोर बोलण्यास तयार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jamun Recipe : वाढदिवसाला घरीच बनवा १० मिनिटांत गुलाबजाम, फक्त वापरा 'हा' एक पदार्थ

Shehnaaz Gill : शहनाज गिल लग्न करणार नाही? 'Ikk kudi'च्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने केलं मोठे विधान

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Maharashtra Elections : एकनाथ शिंदे महायुतीचा वाघ, म्हणूनच लांडगे,कोल्हे,मांजरी..; शिवसेना आमदाराचा विरोधकांवर हल्लाबोल

Jio Special Offer: वाह! २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत १० OTT प्लॅटफॉर्म्स मोफत

SCROLL FOR NEXT