Students checking the FYJC 2024 first merit list online at official portal saam tv
Video

अकरावीच्या प्रवेशाची प्रतीक्षा अखेर संपली! पहिली गुणवत्ता यादी जाहीर, कुठे पाहाल यादी? VIDEO

First Merit List for 11th Admission: राज्यातील ११वीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, विद्यार्थी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव यादीत आहे का हे तपासू शकतात.

Omkar Sonawane

राज्यातील अकरावीच्या प्रवेशाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षण संचालनालयाने दोन दिवस आधीच पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं, मात्र अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे आजच (28 जून) ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. यंदा राज्यभरातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. या यादीनुसार, ज्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले आहे, त्यांनी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा. संगणकीय प्रणालीत आवश्यक बदल करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व योग्य पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव पहिल्या गुणवत्ता यादीत आहे की नाही, याची खात्री करून प्रवेशाबाबतचा निर्णय घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT