Sonu Nigam saam tv
Video

Sonu Nigam FIR : सोनू निगमला ते वक्तव्य भोवलं; बेंगळुरूत गुन्हा दाखल, प्रकरण हायकोर्टात पोहोचलं, VIDEO

Sonu Nigam FIR At Bengaluru, Karnataka : सोनू निगमच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बेंगळुरूत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी सोनू निगमने हायकोर्टात धाव घेतली आहे.

Nandkumar Joshi

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम यानं बेंगळुरूत एका कॉन्सर्टमध्ये कथितरित्या आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून तो अडचणीत सापडला. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाला होता. तो एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यानं कर्नाटक हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे.

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या बेंगळुरू शहर जिल्हा विभाग अध्यक्ष टीए धर्मराज यांनी तक्रार केल्यानंतर अवलाहल्ली पोलीस ठाण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सोनू निगम याने २५ आणि २६ एप्रिलला एका कॉन्सर्टमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तसेच कन्नड नागरिकांच्या भावना दुखावणारे विधान केले. तक्रार केल्यानंतर ३ मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी सोनू निगमने कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT