Devendra Fadnavis Saam tv
Video

Maharashtra Politics: मोठी बातमी! तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे? मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय, वाचा

Finance ministry to NCP Maharashtra : विधानसभा अधिवेशनानंतर महाराष्ट्रातील अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याची चर्चा.

Namdeo Kumbhar

Sunetra Pawar likely new finance minister : दिवंगत अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राने दिली आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच औकाफ ही खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली. पण अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेवले होते. अर्थसंकल्प मांडल्यानंतर या खात्याचा कारभार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ३ महिन्यात अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाईल.

अजितदादा यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार होता. त्यांनी आतापर्यंत ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवावी, असा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेअंतीच ठरलं होतं. पण आता पुन्हा हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT