Parbhani news  Saam Tv
Video

Parbhani News: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारली काळी गुढी, कारण काय? VIDEO

Farmers Protest in Parbhani: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधार्थ परभणी येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारली आणि निषेध व्यक्त केला.

Omkar Sonawane

सरकार स्थापनेपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या सूचना देत आहेत. त्यांच्या या भूमिकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कांदा आणि कापसाच्या हाराने अलंकृत काळी गुढी उभारली. तसेच, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारने तात्काळ कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरची थकबाकी शून्य करावी, अशी मागणी केली. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Maharashtra News Live Update: समगा नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

SCROLL FOR NEXT