Farmer tries to burn BJP MLA house over unpaid crop compensation saam tv
Video

खळबळ ! भाजप आमदाराचा बंगला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न | VIDEO

BJP MLA Sanjay Kute : अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यानं भाजप आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

Nandkumar Joshi

संजय जाधव | साम प्रतिनिधी

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. भाजपचे आमदार संजय कुटे यांचं जळगाव जामोद येथील निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अतिवृष्टीमुळं शेतीचं नुकसान झालं होतं. त्याचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी संतापला आणि त्यानं पेट्रोलची कॅन घेऊन आमदाराच्या बंगल्यात प्रवेश केला. कुटेंच्या स्वीय सहायकानं वेळीच रोखल्यानं पुढील अनर्थ टळला.

आमदार कुटे हे त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी असताना संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला. हातात पेट्रोलचे कॅन होती. मला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो, असं म्हणत तो बंगल्याच्या प्रवेशद्वारकडे जात होता. त्याचवेळी कुटे यांच्या स्वीय सहायकानं त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT