Fake baba saam
Video

पुण्यातील भोंदू बाबाला बेदम चोप, खेडच्या महिलेची केली होती फसवणूक, व्हिडिओ आला समोर

Fake baba cases in Maharashtra Pune : पुण्यातील खेड तालुक्यात महिलेची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला संतप्त नागरिकांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून भोंदूबाबांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Namdeo Kumbhar

भोंदू खरातच्या प्रकऱणानंतर आता ग्रामीण भागातही भोंदूबाबांविरोधात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय. खेड तालुक्यातील पाईट-सावंतवाडी परिसरात एका भोंदूबाबानं महिलेची 5 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबधित भोंदूबाबाला चांगलाच चोप दिलाय. बुवाबाजी करणाऱ्यांचे धाबे आता दणाणलेत

खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळला असून नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अनेक तथाकथित महाराजांनी आपली दुकाने बंद केली आहेत. तर काही ठिकाणी भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांनी थेट लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.दरम्यान, पाईट-सावंतवाडी परिसरात एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या फिरस्त्या बाबाला स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून अशा भोंदूबाबांना दिसताच क्षणी चोप दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

Oral health problems: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतंय? वेळीच व्हा सावध, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

भोंदू खरातची तब्बल ५ लाखांची फी, अमावस्या-पौर्णिमेला गाड्यांच्या रांगा; SIT तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT