नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात रिक्लॅव्ह 625 या अॅंटीबायोटिक औषधं बनावट असल्याचं उघडकीस आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत हा प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही तर 77 हजार बनावट गोळ्यांचं रुग्णांना वाटप देखील करण्यात आलं आहे. गुजरात इथल्या रिफाइंड फार्मा या कंपनीच हे औषध आहे. मात्र ही कंपनी अस्तित्वातच नसल्याचं यावेळी तपासातून उघड झालं आहे.
रिक्लॅव्ह 625 या अॅंटीबायोटिकची बनावट औषध नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्णांना देण्यात येत आहेत, हा प्रकार धक्कादायक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या औषधांचे 200 नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यावेळी हे औषध बनावट असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. ऑगस्ट 2023मध्ये झालेल्या या कारवाईचे अहवाल आत्ता आले असल्याने ही घटना उघड झाली आहे. या काळात जवळपास 77 हजार गोळ्यांचं वाटप रुग्णांना झालं आहे. ज्या कंपनीची ही औषध आहेत त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करणार आहे. मात्र ही कंपनी अस्तित्वातच नसल्याचं उघड झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.