Fact Check  Saam tv
Video

Fact Check : साताऱ्यातील कास पठारावर फिरतेय सिंहांची टोळी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Fact Check about lion roaming on street : साताऱ्यातील कास पठारावर सिंहाची टोळी फिरत असल्याची मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागचं सत्य साम टीव्हीच्या टीमने शोधलं. वाचा सविस्तर

Vishal Gangurde

संदिप चव्हाण, साम टीव्ही

मुंबई : एक दोन नव्हे तर तब्बल 4 सिंह आणि 6 बछडे...ही सगळी सिंहांची टोळी साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर फिरतेय असा दावा करण्यात आलाय...आता कास पठारावर बहर येण्याचा काळ आहे...त्यामुळे कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये दहशत निर्माण झालीय...मात्र, खरंच कास पठारावर सिंह फिरतायत का...? सिंहांने कुणावर हल्ला केलाय का...? याबाबत माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली...आमचे प्रतिनिधी थेट वनअधिकाऱ्यांना भेटले आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली...

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

सिंह फिरत असल्याचा व्हिडिओ साताऱ्यातील नाही.साताऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील जंगलात सिंह नाही. सिंहांचा व्हिडिओ गुजरातमधील असल्याची माहिती आहे. व्हिडिओ व्हायरल करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

त्यामुळे असे व्हिडिओ पाहून त्यावर विश्वास ठेवू नका...कारण, लोक असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय...त्यामुळे आमच्या पडताळणीत साताऱ्यात सिंह फिरत असल्याचा दावा असत्य ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT