Shiv Sena (Shinde faction) leader Ramdas Kadam reacting strongly after casting his vote amid EVM malfunction allegations in Ratnagiri. Saam Tv
Video

EVM च्या विरोधात शिंदे गट आक्रमक; बडा नेता निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार|VIDEO

Ramdas Kadam Complaint To Election Commission Over EVM: रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान EVM मशीन वारंवार बंद पडल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

रत्नागिरी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जामगे येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मतदानादरम्यान EVM मशीन वारंवार बंद पडत असल्याने रामदास कदम यांचा संताप अनावर झाला. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे येत असून मतदारांचा वेळ वाया जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आज घडलेल्या सर्व घटनांची मी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

EVM यंत्रांवर संशय व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर मशीन नीट चालत नसतील तर यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर मला कोणतीही अडचण नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच EVM ऐवजी बॅलेट पेपरची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर EVM वरचा संशय आपोआप दूर होईल, असेही रामदास कदम यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Elections 2026 voting Live update : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये केले मतदान

टीम इंडियाला मोठा धक्का; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात स्टार खेळाडू खेळणार नाही

Maharashtra Live News Update: भुसावळ - खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी जमीन भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची बैठक

Crime News : धुळ्यातील धक्कादायक प्रकार! शेताजवळील नाल्यात सापडला मृतदेह अन्...

Slim Fit Yoga Poses: सडपातळ दिसण्यासाठी कोणता योगा करावा?

SCROLL FOR NEXT