EVM News SaamTv
Video

EVM Hacking : ईव्हीएम हॅकिंगवर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा | Marathi News

Election Commission : विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमच्या हॅकिंगचा आरोप करत बोगस मतदान केल्याचं म्हंटलं होतं. त्यावर आता निवडणूक आयोगाचे अधिकारी ए. एस. चोकलिंगम यांनी मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

निवडणूक अधिकारी ए. एस. चोकलिंगम यांनी ईव्हीएम हॅकिंगचे सर्व प्रकारचे आरोप फेटाळले आहेत. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, वायफायला आणि ब्लुटुथला कनेक्ट होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसंच निवडणुकीत कोणतंही अतिरिक्त मतदान झालं नसल्याचाही दावा निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यानी विधानसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएम संदर्भात शंका व्यक्त केली होती. ईव्हीएम हॅक करण्यात आलेले होते. संध्याकाळनंतर झालेल्या मतदानाचा तपशील द्या, अशीही मागणी मविआच्या नेत्यांनी केली होती. जवळपास २५ जणांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय घेत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यानंतर आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून हा खुलासा करण्यात आला आहे. तसच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT