Assembly Election News Update SaamTv
Video

Assembly Election : उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवा; निवडणूक आयोगाला सूचना

Election Commission : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच पथक सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये निवडणूक आयोगाची बैठक झाली आहे.

Saam Tv

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये निवडणूक आयोगाची बैठक झाली आहे. उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवावी अशा सूचना राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत. तसेच सुट्ट्यांच्या दिवशी मतदान नको आणि उकाड्यावर उपाय हवा अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच पथक सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यातील काही अधिकारी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एक बैठक निवडणूक आयोगाने घेतली. यावेळी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवण्यात यावी अशा सूचना राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला केल्या आहेत. शिवाय सुट्टीच्या दिवशी मतदान नको, उकड्यावरही उपाय करा अशाही सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. उमेदवार खर्च मर्यादा ही 15 लाखांपर्यंत वाढवावी, ज्येष्ठ मतदारांना मतदानादरम्यान सुविधा द्याव्यात, विधानसभा निवडणूक एक टप्प्यात घ्यावी, तर निवडणूक खर्च मर्यादा 40 लाखापर्यंत वाढवावी असं अजित पवार गटाची मागणी आहे. अशा अनेक सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

SCROLL FOR NEXT