BJP News SaamTv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र? भाजपने घेतली मोठी भूमिका

BJP On Government Establishment : सत्तास्थापनेसाठीच्या शपथविधीची तारीख परस्परच जाहीर करून भाजपने एकनाथ शिंदे यांना फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा सूचक इशारा दिला आहे.

Saam Tv

भाजपने सत्तास्थापनेसाठीच्या शपथविधीची तारीख परस्परच जाहीर केली आहे. त्यामुळे हा थेट सूचक इशारच भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिंदेंच्या दबाव तंत्रात भाजप येणार नसून एकनाथ शिंदे यांनी फडणवीस सरकारमध्ये सामील व्हावं असा संदेश दिला आहे, असं देखील सूत्रांकडून बोललं जात आहे.

सत्तास्थापनेच्या निर्णयावर गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील एकनाथ शिंदेंनी भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर गृह खात्यासह महत्वाची खाती देण्यात यावी अशी मागणी शिंदेंनी केली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. याशिवाय विधान परिषदेच्या सभापतिपदाचीही मागणी एकनाथ शिंदेंनी केली. मात्र गृह खातं कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही या भूमिकेवर भाजप ठाम आहे. आता भाजपने थेट शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपसोबत सरकारमध्ये यावं असा सूचक संदेशच एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT