eknath shinde  Saam gtv
Video

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कॅसेट जुनी झाली; एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका, VIDEO

Eknath shinde news : एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. लोकांना आता सोयीसुविधा पाहिजे, असे म्हणत शिंदेंनी टीका केली.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे बंधू अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवत असून आवई उठवण्याची कॅसेट जुनी झाली, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. ते साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाइट' कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, 'काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणुका लढवत असतात. काही लोक अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणुका लढवत असतात. ते दरवेळीप्रमाणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. मराठी माणूस धोक्यात आलाय. मुंबई खतरे में है, ही त्यांची अनेक वर्षांपासून आवई उठवतात. ही कॅसेट जुनी झाली आहे. लोकांनाही ते अंगवळणी पडली आहे. भावनेच्या आधारावर मुंबईची निवडणूक लढवता येणार नाही. मुंबईकर सुज्ञ आहेत. आता लोकांना विकास पाहिजे. सोयीसुविधा पाहिजे. जीवनमान सुधारलं पाहिजे. वाहतूक कोंडी नको पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT